Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

सचिन, वॉर्नच्या ट्वेंटी-20 मालिकेस परवानगी

Sachin and Warne

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व जादुई फिरकीपटू शेन वॉर्न यांनी ठरविलेल्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) परवानगी दिली आहे.

सचिन आणि वॉर्नने 20 षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मालिका अमेरिकेत खेळविण्यात येणार आहे. या साठी आयसीसीची अधिकृत परवानगी घेण्यात आली आहे. त्यामुळे या तीन सामन्यांना आंतरराष्ट्रीय सामन्याची मान्यता असणार आहे. नोव्हेंबरमध्ये खेळविण्यात येणाऱ्या या सामन्यांना आयसीसीची काही हरकत असणार नाही. मात्र, यासाठी काही अटी घालण्यात आल्याचे, सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. अमेरिकत क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी ही मालिका उपयुक्त ठरणार असल्याचे बोलले जात आहे. या मालिकेत सचिन, वॉर्नसह राहुल द्रविड, ग्लेन मॅकग्रा, जॅक् कॅलिस, ऍडन गिलख्रिस्ट, सौरव गांगुली, ब्रायन लारा, व्हिव्हिएस लक्ष्मण आणि वसीम अक्रम यासारखे दिग्गज खेळाडू खेळणार आहेत. याबरोबरच अमेरिकेतील काही खेळाडूंना समाविष्ट करण्यात येणार आहे. विंग्रली फिल्ड (शिकागो), यांकी स्टेडियम (न्यूयॉर्क) आणि डॉडगर स्टेडियम (लॉस एन्जल्स) येथे हे तीन सामने खेळविले जाणार आहेत.