Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

2022 आशियाई स्पर्धेचे यजमानपद हँगझाऊला

2022 ASIAN GAME

2022 मध्ये होणा-या आशियाई स्पर्धेचे यजमानपद चीनमधील हँगझाऊ शहराला मिळाले असल्याची माहिती आशियाई ऑलिम्पिक परिषदेने दिली आहे. यामुळे 19 वी आशियाई स्पर्धा चीनमधील हँगझाऊ शहरात संपन्न होईल. याआधी चीनला 1990 साली बीजिंग व 2010 मध्ये ग्वांगझुमध्ये आशियाई स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान मिळाला होता. शिवाय 2022 मध्ये होणाऱया हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपदही चीनला मिळाल्यामुळे यजमानांनी दुहेरी धमाका साधला आहे. 2018 मधील आशियाई स्पर्धा इंडोनेशियातील जकार्ता येथे होणार आहे.