Whats new

'फेडरल रिझर्व्ह'चे व्याजदर 0.25 टक्क्यांवर कायम

FEDLAR BANK

अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा व्याजदर 0 ते 0.25 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातील अर्थव्यवस्थांचे लक्ष फेडरल रिझर्व्हच्या होणार्या बैठकीकडे लागले होते. जागतिक अर्थव्यवस्था, महागाईत झालेली घट व शेअर बाजारातील अस्थिर वातावरण यासारख्या काही कारणांमुळे फेडरल रिझर्व्हने व्याजदर कायम ठेवले आहेत. मागील धोरणात देखील अमेरिकी फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केली नव्हती.
अमेरिकी बाजारावर ‘फेडरल रिझर्व्ह’ कडून व्याजदर ‘जैसे थे‘ ठेवल्यामुळे जगभरात सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता असून, भारतासह जगभरातील सर्व शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. तब्बल नऊ वर्षानंतर अमेरिकी व्याजदर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु फेडरल रिझर्व्हने व्याजदरवाढ केली असती तर जगातील अनेक बाजारांवर त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता होती.
चीनमधील मंदावलेली अर्थव्यवस्थेमुळे अमेरिकेसोबतच गभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तेलाच्या किंमतीतील घसरण व डॉलरचे वाढते मूल्य यामुळे महागाई दरात घट होत आहे. अमेरिकेची रोजगार आकडेवारी मजबूत असली तरीही जागतिक दबावाचा तेथील अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
भारताने फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाला सामोरे जाण्याची पुर्ण तयारी केली होती. जर फेडरल रिझर्व्हने दरवाढ केलीच तर भारताकडे या समस्येचा सामना करण्याचे उपाय तयार असल्याचे अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले होते. फेडरल रिझर्व्हने अमेरिकी अर्थव्यवस्थेला मंदीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी व्याजदर 2008 पासून 0 - 0.25 टक्के कायम ठेवला आहे.