Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

मतदान यंत्रावर आता ‘नोटा’चे स्वतंत्र चिन्ह

EVM

राजकीय पक्षांप्रमाणेच आता नोटालाही स्वतंत्र चिन्ह मिळाले आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्रावर हे चिन्ह वापरण्यात येणार आहे.

मतदान यंत्रावर काळया रंगाची फुली हे नोटाचे चिन्ह असेल. अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ डिझाईनने हे चिन्ह तयार केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 2013 मध्ये निवडणूक आयोगाने मतदान यंत्रावर सर्वात शेवटी नोटाचा समावेश केला होता. 2014 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत 60 लाख मतदारांनी नोटाचा वापर केला होता. मात्र, त्यावेळी नोटाला स्वतंत्र चिन्ह देण्यात आले नव्हते.