Whats new

ऑस्ट्रेलियन संघाला एस.श्रीरामचे मार्गदर्शन

s.sriram

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ आपल्या आगामी बांगलादेश दौ-याची तयारी आतापासूनच करीत आहे. बांगलादेशमधील खेळपटृय़ा फिरकीला अनुकूल असल्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना फिरकीचा सराव व्हावा यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताचा माजी अष्टपैलू श्रीधरन श्रीरामची प्रशिक्षक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
39 वर्षीय श्रीरामने 2000 ते 2004 या कालावधीत 8 वनडे सामने खेळले असून तो डावखुरा फलंदाज आणि डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून ओळखला गेला. भारतातील टी-20 स्पर्धामध्ये एस. श्रीराम साहाय्यक प्रशिक्षक ही जबाबदारी सांभाळत होते. अलिकडे एस. श्रीराम ऑस्ट्रेलिया अ संघाचे मार्गदर्शक आहेत. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना फिरकीचा सराव करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने यापूर्वी विदेशी सल्लागाराची नियुक्ती केली होती. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात पहिली कसोटी 9 ऑक्टोबरपासून चित्तगाँगमध्ये तर दुसरी कसोटी 17 ऑक्टोबरपासून ढाक्यामध्ये खेळविली जाणार आहे.