Whats new

ललिता बाबर, अरोक्या राजीव उत्कृष्ट खेळाडू

lalita babar

महाराष्ट्राची आणि रेल्वेत कार्यरत असलेली ललिता बाबर आणि सेनादलाच्या अरोक्या राजीवला ५५ व्या राष्ट्रीय खुल्या मैदानी स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंचा मान देण्यात आला. वेगवान धावपटू रेल्वेच्या दूती चंदने महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून दुहेरी मुकुट संपादन केला. दूतीने आधी १०० मीटरची शर्यत जिंकली होती.
भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघांतर्गत आयोजित या स्पर्धेत रेल्वे संघाने २६७ गुण संपादन करून सर्वसाधारण आणि १८४ गुणांसह महिलांचे विजेतेपद जिंकला. सेनादलाच्या संघाला १७४.५ गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत टिंटू लुकाने २ मिनिटे ५६ सेकंदांची वेळ नोंदवून नवीन स्पर्धाविक्रमाची नोंद करून सुवर्णपदक जिंकले.