Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

डेव्हिस चषक आशिया/ओशेनिया गटात भारत अव्वलस्थानी कायम

davis-cup-logo-2015

अलीकडे डेव्हिस चषक प्लेऑफ लढतीत झेक प्रजासत्ताककडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतरही पुढील वर्षी होणा-या डेव्हिस चषक आशिया/ओशेनिया गटात मध्ये भारताला अव्वलस्थान मिळाले आहे. तर उझबेकिस्तानला दुसरे स्थान लाभले आहे.
भारत व उझबेकिस्तानला पहिल्याच फेरीत पुढे चाल मिळाली आहे. आशिया/ओशेनिया गट -1 मधील पहिला टप्पा मार्च 2016 मध्ये होणार आहे. डेव्हिस चषकातील लढतीचा ड्रॉ चिली येथे होणा-या आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या बैठकीत काढला जाणार आहे. आशिया/ओशेनिया गटात भारताशिवाय उझबेकिस्तान, चीन, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड व पाकिस्तानचा समावेश आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या प्लेऑफ लढतीत भारताला झेककडून 3-1 असा पराभव स्वीकारावा लागल्याने आहे त्याच गटात पुढील वर्षी खेळावे लागणार आहे. या विभागात जरी भारत व उझबेकिस्तानला पहिले व दुसरे मानांकन मिळालेले असले तरी जागतिक मानांकनात भारत 21 व्या व उझबेकिस्तान 25 व्या स्थानावर आहे. यावर्षी ब्रिटन व बेल्जियम यांच्यात डेव्हिस चषक जेतेपदाची लढत होणार असून बेल्जियमने 111 वर्षांच्या खंडानंतर स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. ही लढत 27 ते 29 नोव्हेंबर 2015 या कालावधीत बेल्जियममध्येच होणार आहे.