Whats new

दिल्ली आणि मुंबई जगातील स्वस्त शहरे

Delli and Mumbai

दिल्ली आणि मुंबई ही शहरे भारतीयांसाठी कदाचित सर्वात महागडी शहरे म्हणून ओळखली जात असतील; पण जगातील सर्वात महागड्या शहरांच्या तुलनेत ही शहरे चक्क स्वस्त शहरांच्या यादीत आहेत. स्वीस बँक युबीएसच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. शहरी भागातील निवासाचा खर्च, रोजगार, खाद्यपदार्थांच्या किमती असे निकष ठेवून जगातील प्रमुख शहरांचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. लंडन हे महागड्या शहराच्या यादीत भलेही पाचव्या स्थानावर असेल; पण कामगारांच्या मजुरीचा किमान दर राखण्यात हे शहर अपयशी ठरले आहे.
ज्युरिक, जिनेव्हा, न्यूयॉर्क, ओस्लो ही शहरेही महागडी असली तरी या शहरात कर्मचाऱ्यांचे वेतन समाधानकारक नाही. सिडनी, कोपेनहेगन, शिकागो ही शहरे निवासासाठी स्वस्त आहेत. लंडनमध्ये घरभाडे सर्वाधिक असून घरांची वाढती मागणी पूर्ण करण्यात सरकारला अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. २००७-०८ च्या आर्थिक मंदीनंतर आर्थिक सुधारणा वेग घेत आहेत. झुरिक, सियोल, न्यूयॉर्कच्या तुलनेत लंडन हे खाद्यपदार्थांसाठी महागडे शहर म्हणून नोंदवले गेले आहे. जगभरातील प्रमुख ७१ शहरांमध्ये ज्या स्वस्त शहरांचा उल्लेख करण्यात आला आहे.