Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to www.allauddin.co.in

Allauddin

विदर्भात फलोत्पादन बीजोत्पादन प्रशिक्षण प्रकल्प!

Falotpadan

विविध कंपन्यांचे बियाणे अनुत्पादित व बोगस निघत असल्याने शुद्ध बीजोत्पादन कार्यक्रमावर भर दिला जात असून, विदर्भात खरीप, रबीनंतर फलोत्पादन बीजोत्पादन प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यास राज्याच्या कृषी मंत्रालयाने मान्यता दिली आहे. २०१५-१६ व २०१६-१७ अशी दोन वर्षे हा प्रकल्प विदर्भात राबविण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात या प्रशिक्षण प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे.
शेतक-यानी स्वत: उच्च प्रतीचे शुद्ध बियाणे निर्माण करण्यासाठी मागील वर्षी राष्ट्रीय कृषी विकास (आरकेव्हीवाय) प्रकल्पांतर्गत या कृषी विद्यापीठाला ८ लाखांचे अनुदान प्राप्त झाले होते. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना बीजोत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे शेतक-यांनी त्यांच्या शेतावर विविध पिकांचे बीजोत्पादन करण्यात सुरुवात केली आहे. आता नव्याने चालू आर्थिक व पुढच्या आर्थिक वर्षासाठी राज्यात शेती व उद्यान विद्या बीजोत्पादन निर्मितीवर भर दिला जाणार असून, त्यासाठी शेतक-यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. म्हणूनच बीजोत्पादन कार्यक्रमाला गती देण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला राज्याच्या कृषी मंत्रालयाने या विषयावरील प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यासाठीची मान्यता दिली आहे.
या प्रकल्पांतर्गत गटशेतीद्वारे विविध शेती, उद्यान विद्या बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अगोदर आदिवासी भागातील शेतक-यांना बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला आहे.