Whats new

ग्रीसचे माजी पंतप्रधान अलेक्सिस सीप्रास यांचा पुन्हा विजय

greece-cyprus-egypt

ग्रीसचे करिश्माई कट्टर डावे नेते अलेक्सिस सीप्रास यांना पुन्हा एकदा देशाचा प्रमुख बनण्यासाठी जनादेश मिळाला आहे. सीरित्झा या डाव्या पक्षाला कंजर्वेटिव्हच्या 28 टक्क्यांच्या तुलनेत अधिक मते मिळाली आहे. या विजयाबरोबरच न्यू डेमोक्रेसी पक्षाचे नेते वँगेलिस मीमाराकिस यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. याआधी सीप्रास यांनी घोषणा केली की, सत्तेत पहिल्यावेळी 7 महिन्यांच्या अस्थिर वातावरणाच्या संकटाचा सामना करणाऱया अर्थव्यवस्थेत नवा प्राण फुंकणे आणि सुधार करण्यासाठी दुसरा जनादेश मिळाल्याने आपण आश्वस्त आहोत. ग्रीसमध्ये गेल्या वर्षी आर्थिक संकट निर्माण झाले होते. युरोपियन युनियनच्या मदतीनेच हा देश तरला आहे.