Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

अमेरिकन विजेती पेनेटा मुंबई मास्टर्स संघात

Champions-Tennis-League

अलीकडेच झालेल्या अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद मिळविलेल्या इटलीच्या फ्लाविया पेनेटाला या वर्षी होणा-या चॅम्पियन्स टेनिस लीगमध्ये (सीटीएल) मुंबई मास्टर्स संघाने सामील करून घेतले आहे. याशिवाय 1996 मध्ये विम्बल्डन स्पर्धेत पुरुष एकेरीचे जेतेपद मिळविलेल्या हॉलंडच्या रिचर्ड प्रायसेकलाही मुंबई मास्टर्सने आपल्या संघात स्थान दिले आहे. येथे या स्पर्धेतील सर्व संघांची घोषणा करण्यात आली. सीटीएलचे हे दुसरे वर्ष असून भारतीय डेव्हिस संघाचे माजी कर्णधार विजय अमृतराज यांची ही संकल्पना आहे. 23 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. गेल्या वर्षी ही स्पर्धा दहा दिवस घेण्यात आली होती. पण यावेळी त्यात चार दिवसांनी वाढ करण्यात आली असल्याचे विजय अमृतराज यांनी सांगितले. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही सहा शहरांचे प्रँचायजी संघ राहणार असून त्यापैकी मुंबई, हैदराबाद, चंदिगड, नवे संघ रायपूर व नागपूर हे पाच संघ निश्चित झाले आहेत. पुणे, चेन्नई, बेंगळूर यापैकी एक सहावा संघ असणार आहे.

या स्पर्धेतील विजेत्या संघाला 1 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार असून उपविजेत्याला 50 लाख रुपये मिळतील. अमेरिकन स्पर्धेत अँडी मरेला हरविणारा दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसन तसेच ज्योकोव्हिकला चारपैकी तीन लढतीत हरविणारा क्रोएशियाचा इव्हो कार्लोव्हिक हे अनुक्रमे टीम रायपूर व हैदराबाद एसेस संघाचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेत सहभागी होणाऱया अन्य नामवंत खेळाडूंत इटलीचा आंद्रेयास सेपी (मुंबई), सायप्रसचा मार्कोस बॅघडॅटिस (पंजाब मार्शल्स, चंदिगड), फ्रान्सचे फेलिसियानो लोपेझ (टीम नागपूर), फर्नांडो व्हर्डास्को (अघोषित सहावा संघ) यांचा समावेश आहे.

महिला टेनिसपटूंत पेनेटाव्यतिरिक्त स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस (हैदराबाद), सर्बियाची येलेना यांकोव्हिक (नागपूर), फ्रान्सची ऍलिझ कॉर्नेट (रायपूर), युक्रेनची इलिना स्विटोलिना (चंदिगड), ब्रिटनची हीदर वॅटसन (सहावा संघ) यांचा समावेश आहे. या स्पर्धेतील सामने सहा विविध शहरात होणार असून 23 नोव्हेंबर रोजी उद्घाटनाची लढत मुंबईत होणार आहे. प्रत्येक लढतीत पाच सामने होणार असून रायपूर वगळता इतर सामने आऊटडोअर हार्डकोर्टवर खेळविण्यात येतील. रायपूरमध्ये इनडोअर हार्डकोर्टवर सामने खेळविले जातील. स्पर्धेचे वेळापत्रक येत्या चार-पाच दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याचेही अमृतराज यांनी सांगितले.

स्पर्धेत सहभागी झालेले संघ व त्यातील खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत :
1) पंजाब मार्शल्स, चंदिगड : गेग रुसडेस्की (लेजेंड) इंग्लंड, बॅघडॅटिस (एटीपी खेळाडू) सायप्रस, स्विटोलिना (डब्लूटीए) युक्रेन, साकेत मायनेनी भारत.
2) हैदराबाद एसेस : थॉमस जोहान्सन स्वीडन, कार्लोव्हिक क्रोएशिया, हिंगीस स्वित्झर्लंड, एन. जीवन भारत.
3) मुंबई मास्टर्स : रिचर्ड क्रायसेक हॉलंड, आंद्रेयास सेपी इटली, पेनेटा इटली, श्रीराम बालाजी भारत.
4) टीम नागपूर : ऍलेक्स कोरेया स्पेन, फेलिसियानो लोपेझ स्पेन, येलेना यांकोव्हिक सर्बिया, दिविज शरण भारत.
5) टीम रायपूर : थॉमस मस्टर ऑस्ट्रिया, केव्हिन अँडरसन द.आफ्रिका, ऍलिझ कॉर्नेट फ्रान्स, रामकुमार रामनाथन भारत.
6) अघोषित संघ : रेनर शुटलर जर्मनी, फर्नांडो व्हर्डास्को स्पेन, हीदर वॅटसन ब्रिटन, विष्णू वर्धन भारत.