Whats new

बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी सौरभ गांगुली

SAURABHA GANGULY

माजी भारतीय कर्णधार सौरभ गांगुलीची पश्चिम बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर बंगाल संघटनेची सूत्रे कोणाकडे, या चर्चेला यामुळे पूर्णविराम मिळाला.
राज्य सचिवालयात मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल क्रिकेट संघटनेतील काही वरिष्ठ पदाधिकारी व राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सदर निवडीवर शिक्कामोर्तब केले. दालमियांचे चिरंजीव अविशेक यांची यावेळी गांगुलीच्या जागेवर संयुक्त सचिवपदी वर्णी लागली. सुबीर गांगुली पूर्वीप्रमाणेच दुसरे संयुक्त सचिव व बिस्वरुप डे खजिनदारपदी कायम असतील.