Whats new

सर्वात श्रीमंत 100 भारतीयांच्या यादीत अवघ्या 4 महिला

savitri

एकीकडे सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. मात्र कमाईच्या बाबतीत भारतीय महिला पुरुषांच्या तुलनेत मागे पडत असल्याचं चित्र आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत 100 व्यक्तींच्या यादीत फक्त 4 महिलांचा समावेश आहे.
100 श्रीमंतांच्या यादीत ओपी जिंदाल समुहाच्या अध्यक्षा, नवीन जिंदाल यांच्या मातोश्री सावित्री आणि जेनेरिक औषध कंपनी यूएसवी फार्माच्या अध्यक्षा लीना तिवारी यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे हॅवेल्सचे संस्थापक कीमत राय गुप्ता यांची पत्नी विनोद आणि बेनेट कोलमन अँड कंपनीच्या इंदू जैन यांनाही 100 जणांच्या यादीत स्थान मिळालं आहे.
चारही महिलांची एकत्रित संपत्ती 9.2 अब्ज डॉलर (552 अब्ज रुपये) इतकी आहे. सर्व 100 व्यक्तींच्या एकत्रित संपत्तीच्या 3 टक्के संपत्ती महिलांकडे आहे. 3.8 अब्ज डॉलर (228 अब्ज रुपये) संपत्तीसह सावित्री जिंदाल या सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. 100 भारतीय श्रीमंतांच्या यादीत त्या 23 व्या क्रमांकावर आहेत. लीना तिवारी 54 व्या, 1.9 अब्ज डॉलर (114 अब्ज रुपये) संपत्तीसह इंदू जैन 57 व्या तर विनोद गुप्ता 74 व्या स्थानावर आहेत.