Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

एटीएममध्ये 50 रुपयांच्या नोटा मिळणार

50 RUPEES NOTE

देशात बँकांच्या एटीएममध्ये केवळ खातेधारकाला प्रामुख्याने 1000, 500, 100 रुपयांच्या चलनी नोटा प्राप्त होतात. मुख्य म्हणजे आवश्यकता नसतानाही लोकांना अनेक वेळा 500 रुपयांच्या नोटा काढाव्या लागतात. मात्र आता येणा-या काही दिवसात 500, 100 रुपयांसहित 50 रुपयांच्या नोटाही बॅंक एटीएममध्ये उपलब्ध होतील. बँकांच्या एटीएममध्ये जास्तीत जास्त 500 रुपयांच्या नोटा उपलब्ध असतात, त्यामुळे त्यांना आर्थिक व्यवहार करणे त्रासदायक ठरतात. आरबीआयने बँकांना निर्देश दिले आहेत की, लोकांना होणारा त्रास लक्षात घेता एटीएममध्ये 50 रुपयांच्या चलनी नोटा आवश्यक आहेत. त्याप्रमाणे बँक एटीएममध्ये 500 रुपयांच्या नोटा असतील तर 100 रुपयांच्या नोटा असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे 100 रुपयांच्या नोटा असतील तर 50 रुपयांच्या नोटा असणे आवश्यक असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

यासाठी बँकांना एटीएममध्ये नोट टाकण्याच्या पद्धतीत किंचित बदल करावा लागणार आहे. यासाटी काही कालावधी लागेल. बँकांच्या मतानुसार, आरबीआयच्या आदेशानुसार, एटीएममध्ये दोन किमतीच्या वर्गातील नोटा ठेवणे आवश्यक असते. ज्याप्रमाणे 1000 बरोबर 500 आणि 500 बरोबर 100 रुपयांच्या नोटा ठेवणे आवश्यक आहे. आता बँकांना 100 रुपयांसहित 50 रुपयांची नोट ठेवणे गरजेचे आहे.