Whats new

ओबामांकडून तीन भारतीयांची सल्लागार परिषदेवर नियुक्ती

OBAMA

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी भारतीय वंशाच्या तीन अमेरिकन व्यक्तींची सल्लागार परिषदेवर नियुक्ती केली आहे. यात प्रीता बंसल, निपुण मेहता आणि जसजित सिंह यांचा समावेश आहे. आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आणि धर्मनिरपेक्ष व्यक्तींची या परिषदेवर निवड केली जाते.

यावेळी बोलताना ओबामा म्हणाले की, आपापल्या क्षेत्रात काम करताना या तीन व्यक्ती अमेरिकन जनतेची सेवा करतील याचा मला विश्वास आहे. प्रीता बंसल एमआईटीत व्याख्याता आहेत. निपुण मेहता सर्व्हिस स्पेस या संघटनेचे संस्थापक, तर जसजित सिंह शीख अमेरिकन लीगल डिफेंस अॅण्ड एज्युकेशन फंडचे कार्यकारी संचालक आहेत