Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

दक्षिण आशियातील शहरांमध्ये दिल्ली सर्वांत जास्त प्रदूषणग्रस्त

POLLUTION

शहरीकरणाच्या वेगामुळे दक्षिण आशियाचा भाग प्रदूषणग्रस्त बनला असून विकसनशील देशांतील 381 शहरात दिल्ली सर्वात जास्त प्रदूषणग्रस्त असल्याचे जागतिक बँकेच्या अगदी अलिकडील अहवालात म्हटले आहे. त्याच्या माहितीप्रमाणे 20 पैकी 19 शहरे प्रदूषणग्रस्त आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाने दक्षिण आशियातील बांगलादेश, भारत, नेपाळ आणि पाकिस्तानमधील शहरांतील मृत्यूदर ग्रामीण भागाच्या तुलनेत जास्त असल्याचे म्हटले आहे. यादेशातील शहरी भागात 2.5 स्तरावरील वातावरण प्रदुषण आढळून आले आहे.

वाहनांद्वारे सोडला जाणारा धूर व उद्योगक्षेत्रातील जळणयामुळे झालेल्या वातावरणप्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन दमा, फुफ्फुसाचा कर्करोग, श्वसनविषयक तीव्र आजार व हृदयविकार यांना आमंत्रण मिळत असल्याचे हूच्या अहवालाचा हवाला देत, जागतिक बँकेने म्हटले आहे. भारतातील शहरेच प्रदूषणग्रस्त नसून कराची, डाका तसेच काबूल सारखी शहरेही प्रदूषणग्रस्त असल्याचे, जागतिक बँकेच्या अहवालाने म्हटले आहे.

धूर ओकणारी वाहने तसेच उद्योगक्षेत्रातील जळणामुळेच प्रदूषणवाढ होत नसून शहरातील वाढती लोकसंख्या हे सुद्धा त्यामागील प्रमुख कारण आहे. त्यामुळे इतर ठिकाणाहून या प्रदेशात वातावरण प्रदूषण अधिक प्रमाणात होत असते.