Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

सानिया-हिंगीसला ग्वांग्झू ओपनचे जेतेपद

SANIYA MIRZA AND HINGIS

जागतिक क्रमवारी अव्वलस्थानी विराजमान असलेल्या भारताच्या सानिया मिर्झा व तिची स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसने ग्वांग्झू ओपनमधील महिला दुहेरीतील लढतीत चीनच्या शिलिन शू व शियाओडी यू या जोडीला पराभूत करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या जेतेपदासह सानिया-हिंगीस जोडीने 250,000 अमेरिकन रकमेची कमाई केली. ग्वांग्झू आंतरराष्ट्रीय टेनिस कोर्टवर झालेल्या या लढतीत अग्रमानांकित सानिया-हिंगीस जोडीने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करताना शिलिन-शियाओडी जोडीला 6-3, 6-1 असे नमवित जेतेपद मिळवले. सानियाचे यंदाच्या हंगामातील हे सातवे जेतेपद तर कारकिर्दीतील एकूण 29 वे जेतेपद आहे. तसेच सानिया व मार्टिना जोडीचे एकत्ररित्या हे सहावे जेतेपद ठरले. यंदा मार्च महिन्यात दोघीनी एकत्र खेळायला सुरुवात केली आणि विम्बल्डंन, अमेरिकन ओपनबरोबरच इंडियाना वेल्स, मियामी ओपन व चाल्सर्टन ओपनचे जेतेपदही पटकावले आहे. वुहान ओपनमध्ये सानिया-हिंगीस जोडीला अव्वलमानांकन मिळाले आहे.