Whats new

पॅन पॅसिफिक स्पर्धेत ऍग्निसेझ्का रॅडवान्स्काला २०१५ चे अजिंक्यपद

pan pacific

पोलंडच्या ऍग्निसेझ्का रॅडवान्स्काने उदयोन्मुख स्टार खेळाडू बेलिंडा बेन्सिकला 6-2, 6-2 अशा एकतर्फी फरकाने नमवूत पॅन पॅसिफिक खुली टेनिस स्पर्धा जिंकली. शिवाय, पुन्हा एकदा जागतिक मानांकन यादीतील पहिल्या दहामध्ये स्थान प्राप्त केले. तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर तिचे हे पहिलेच डब्ल्यूटीए जेतेपद ठरले आहे.

वास्तविक, जून महिन्यात ईस्टबोर्न स्पर्धेत उभय टेनिसपटू आमनेसामने भिडल्या, त्यावेळी बेन्सिकने रॅडवान्स्काला नमवले होते. पण, या लढतीत बेन्सिकला दर्जेदार खेळ साकारता आला नाही. 18 वर्षीय बेन्सिकने यंदा गॅरबिने म्युगूरुझा व कॅरोलिन वोझ्नियाकी अशा दिग्गजांना मात दिली. मात्र, अंतिम फेरीत तिला रॅडवान्स्काने जेरीस आणले. आता सोमवारी जाहीर होणा-या नव्या मानांकन यादीत 13 व्या स्थानावरुन रॅडवान्स्का आठव्या स्थानी झेप घेईल, हे जवळपास निश्चित मानले जाते.