Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

अंतराळात भारताची आणखी एक गवसणी 

ASTROSAT

ब्रह्मांडाची विस्तृत माहिती गोळा करण्याच्या लक्ष्यावर आधारित आपली पहिली अंतराळ वेधशाळा ‘ऍस्ट्रोसॅट’चे भारताने यशस्वीपणे प्रक्षेपण केले. पीएसएलव्ही-सी 30 द्वारे श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण करण्यात आले. ऍस्ट्रोसॅट आपल्यासोबत 6 विदेशी उपग्रह देखील घेऊन गेला आहे, ज्यात 4 अमेरिकी उपग्रह आहेत. चंद्रयान आणि मंगळ यानानंतर अवकाश संशोधनात पुढील पाऊल टाकत इस्रोतर्फे पूर्णपणे खगोलशास्त्राला वाहिलेला उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे. देशातील संशोधन संस्थांच्या सहभागाने या उपग्रहाची निर्मिती करण्यात आल्याने  खगोल संशोधनातील गरजांची पूर्तता होणार आहे. एकाचवेळी विविध फ्रिक्वेन्सीवर निरीक्षणे घेऊ शकणारा हा जगातील पहिला उपग्रह आहे. 1975 मध्ये आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह देखील खगोलीय निरीक्षणांसाठी प्रक्षेपित करण्यात आला होता. मात्र तो फक्त 5 दिवसच सक्रिय राहू शकला होता. भारताने अमेरिकी उपग्रह प्रक्षेपित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे उपग्रह सॅन फ्रान्सिस्कोच्या एका कंपनीचे आहेत. त्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) व्यावसायिक शाखा एंट्रिक्स कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत करण्यात आलेल्या करारांतर्गत प्रक्षेपित करण्यात आले. सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आलेल्या या प्रक्षेपणात इस्रोच्या विश्वसनीय पोलर सॅटेलाइट लाँच व्हेईकल  ‘पीएसएलव्ही’ची मदत घेण्यात आली. आपल्या 31 व्या उड्डाणांगर्तत पीएसएलव्हीने उड्डाण सुरू झाल्याच्या 25 मिनिटांनंतर ऍस्ट्रोसॅल आणि 6 उपग्रहांना त्यांच्या कक्षेत स्थापित केले.
जगातील चौथा देश
प्रक्षेपणाच्या 22 मिनिटांच्या आतच हे अंतराळात पोहोचल्याचे सांगण्यात आले. भारत ही अंतराळ सुविधा प्राप्त करणाऱया जगाच्या निवडक देशांमध्ये सामील झाला आहे. भारताआधी अमेरिका, रशिया आणि जपानने अंतराळ वेधशाळा प्रक्षेपित केली आहे. आतापर्यंत 51 विदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण या प्रक्षेपणावेळी केंदीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री वाय.एस. चौधरी देखील उपस्थित होते. त्यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे या यशानंतर अभिनंदन केले. पीएसएलव्ही सी30 मध्ये ऍस्ट्रोसॅटशिवाय आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे जे उपग्रह नेण्यात आले, त्यात इंडोनेशियाची एलएपीएन-ए2 (समुद्री टेहळणीसाठी), कॅनडाचा समुद्री देखरेख नॅनो उपग्रह एनएलएस-14 सामील आहे. याचबरोबर इस्रोद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेल्या जागतिक उपग्रहांची संख्या 51 झाली आहे. या जागतिक ग्राहकांमध्ये जर्मनी, फ्रान्स, जपान, कॅनडा, ब्रिटन समवेत एकूण 20 देश सामील आहेत.
ऍस्ट्रोसॅटची उद्दिष्टे
कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱयांच्या जोडीमध्ये उच्च ऊर्जा प्रक्रियांचे अध्ययन.
न्यूट्रॉन ताऱयांच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करणे.
ता-यांचे जन्मक्षेत्र तसेच आमच्या आकाशगंगेबाहेरील क्षेत्राचा अभ्यास
अल्ट्राव्हायोलेट क्षेत्रात जगाच सर्वेक्षण.