Whats new

सलग 22 वेळा बिल गेटस्ठरले सर्वांत श्रीमंत

BIL GET’S

अमेरिकेतील 400 सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये मायक्रोसॉफ्टचे जनक बिल गेटस्यांनी सलग 22 व्या वर्षी पहिले स्थान पटकाविले आहे. फोर्ब्ज मासिकाने प्रकाशित केलेल्या अमेरिकेतील श्रीमंतांच्या यादीमध्ये 59 वर्षे वय असलेल्या गेटस्यांची एकूण संपत्ती 76 अब्ज डॉलर्स असल्याचे म्हटले आहे. 
या चारशे श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये भारतीय वंशाच्या चार व्यक्तींचा समावेश आहे. त्यामध्ये 194 क्रमांकावर जॉन कपूर, 234 व्या क्रमांकावर रोमेश टी. वाधवानी, 268 व्या क्रमांकावर भारत देसाई तर 358 व्या क्रमांकावर राम श्रीराम यांचा समावेश आहे. या यादीतील 400 श्रीमंतांची एकूण संपत्ती 2340 अब्ज डॉलर्स आहे. ही संपत्ती 2014 मध्ये 2290 अब्ज डॉलर्स होती. अमेरिकेतील श्रीमंतांच्या यादीमध्ये सोशल मिडिया क्षेत्रातील कंपन्यांचा मोठा प्रभाव आढळून आला आहे. त्यामध्ये फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग हे 40.3 अब्ज डॉलर्ससह सातव्या क्रमांकावर पोचले आहेत. तर गुगलचे लॅरी पेज हे 33.3 अब्ज डॉलर्ससह दहाव्या स्थानावर विराजमान आहेत.