Whats new

कॅनडाचा मिलोस रेओनिक अजिंक्य 

REONIC

कॅनडाच्या द्वितीय मानांकित मिलोस रेओनिकने येथे एटीपी टूरवरील सेंट पीटर्सबर्ग खुल्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकाविले. जागतिक टेनिसपटूंच्या क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या 24 वर्षीय रेओनिकने अंतिम सामन्यात पोर्तुगालच्या सातव्या मानांकित सोसाचा 6-3, 3-6, 6-3 असा पराभव केला.
येत्या नोव्हेंबरमध्ये लंडन येथे होणाऱया एटीपी विश्व टूर अंतिम स्पर्धेच्या पात्रतेसाठी रेओनिकचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. सोसाविरूध्दच्या अंतिम सामन्यात रेओनिकने 22 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. 2015 च्या टेनिस हंगामातील रेओनिकचे हे पहिले तर वैयक्तिक कारकीर्दीतील सातवे विजेतेपद आहे. एटीपी विश्व टूर अंतिम स्पर्धेसाठी सर्बियाचा जोकोव्हिक, स्वित्झर्लंडचे रॉजर फेडरर आणि वावरिंका तसेच ब्रिटनचा ऍन्डी मरे हे यापूर्वीच पात्र ठरले आहेत.