Whats new

भारताचे अव्वल नेमबाज गुरप्रीत सिंग व जितू राय आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक

GURPIT AND JITU

भारताचे अव्वल नेमबाज गुरप्रीत सिंग व जितू राय यांनी येथे सुरू असलेल्या आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले.
इराणच्या सेपेहर सफारी बोरुजेनीने या प्रकारात 198.7 गुण घेत सुवर्ण जिंकून सर्वांनाच चकित केले. आठ स्पर्धकांच्या या लढतीत जितूने प्रारंभापासूनच आघाडी घेतली होती. पण अर्ध्यावर असताना तो मागे पडला. याउलट गुरप्रीतने शानदार प्रदर्शन करीत हळूहळू आघाडी घेत मुसंडी मारली. त्याने अंतिम फेरीत 197.6 गुण घेतले तर जितूने 177.6 गुण घेत तिसरे स्थान मिळविले. तिसरा भारतीय नेमबाज ओम्कार सिंगने अंतिम फेरीत केवळ 77.5 गुण घेत आठवे स्थान मिळविले.