Whats new

भारत-अमेरिकामध्ये हेलिकॉप्टर करार

INDIA-AMERICA

भारताने 22 अपाचे हेलिकॉप्टर आणि 15 चिनूक हेवी हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी अमेरिकेशी सुमारे तीन बिलियन डॉलरचा करार केला आहे. भारत सरकारने अमेरिकेतील विमान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी बोईंग आणि तेथील सरकारशी केलेल्या करारात उभय पक्षांकडून त्यावर सह्या करण्यात आल्या. दोन्ही देशांत करण्यात आलेल्या या करारानुसार तीन ते चार वर्षामध्ये पहिल्या हेलिकॉप्टर्सची निर्मिती होऊन ते भारताकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. 22 अपाचे आणि 15 चिनूक हेलिकॉप्टरच्या खरेदी करारावर स्वाक्षऱ-या करण्यात आल्या.