Whats new

दीक्षित राज्याचे पोलीस महासंचालक

PRAVIN DIXIT

सेवानिवृत्त होत असलेले संजीव दयाल यांच्या जागी भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ ठरलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक प्रवीण दीक्षित यांची नवे पोलीस महासंचालक म्हणून निवड करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या नियुक्त्यांना मंजुरी दिली. महामंडळ सुरक्षा विभागाचे प्रमुख विजय कांबळे हे एसीबीचे प्रमुख असतील. पोलीस गृहनिर्माण विभागाचे महासंचालक अरुप पटनायक सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी सतीश माथूर यांची नियुक्ती झाली आहे. विधी आणि तांत्रिक विभागाच्या महासंचालकपदी मीरा बोरवणकर यांना बढती देण्यात आली आहे.
प्रवीण दीक्षित हे १९७७ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. एसीबीचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी गेल्या दोन वर्षांत भ्रष्ट व लाचखोरांविरुद्ध धडक मोहीम उघडली. लाचखोरांना पकडण्यासाठी त्यांनी राबविलेल्या विविध योजनांमुळे भ्रष्टाचारी पोलिसांसह शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले होते. 1977 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेले दयाल ३१ जुलै २०१२ पासून पोलीस महासंचालक होते. राज्य पोलीस दलाच्या इतिहासात त्यांच्या इतका ३८ महिन्यांचा दीर्घ कालावधी यापूर्वी केवळ के. सी. मेढेकर यांनाच मिळाला.