Whats new

रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात अर्ध्या टक्क्याने कपात

RBI

भारतीय रिझर्व्ह बँकेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पतधोरण जाहीर करण्यात आले असून, बँकेच्या रेपो दरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे गृह व वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात 50 बेसिस पॉईटने म्हणजेच अर्ध्या टक्क्याने कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रेपा दर आता 6.75 टक्के, तर रिव्हर्स रेपोदर 5.75 टक्के इतका कमी झाला आहे. रेपो दरातील कपातीनंतर सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होण्याची शक्यता असून, याचा सर्वाधिक लाभ गृह व वाहन कजदारांना होणार आहे.
परिणामी गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कर्जाच्या हफ्त्यातही कपात होणार आहे. त्यामुळे रिअल इस्टेट आणि ऑटोमोबाईल सेक्टरला दिलासा मिळाला आहे.