Whats new

एअरटेल जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोबाईल कंपनी

airtel  

सुनील मित्तल यांच्या नेतृत्वाखाली घौडदोड करणारी भारतीय एअरटेल 30.3 कोटी ग्राहकांच्या साथीने जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी मोबाईल कंपनी बनली आहे. भारती एअरटेल भारत, बांग्लादेश, आणि आफ्रिकेसह 20 देशांमध्ये व्यवसाय करते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारती एअरटेल ग्राहक संस्थेचा विचार करावयाचा झाल्यास जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी बनली आहे.

वर्ल्ड सेल्युलर इन्फॉर्मेशन सर्व्हिस (डब्ल्युसीआयएस) ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, एअरटेलच्या सर्व व्यवसायातील ग्राहक संस्था 30.3 कोटीपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळेच कंपनी जागतिक मानांकनात एक पाऊल पुढे आहे.

डब्ल्युसीआयएसच्या मते, चीनची, चायना मोबाईल 62.62 कोटी ग्राहकांच्या साथीने प्रथम क्रमांकावर आहे. ब्रिटनचा व्होडाफोन गुप 40.30 कोटी ग्राहकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चायना युनिकॉम 29.9 कोटी ग्राहकांच्या साथीने चौथ्या तर अमेरिकेची मोविल 27.41 कोटी ग्राहकांसह पाचव्या क्रमांकावर आहे.