Whats new

एसएमएसचे जनक मॅट्टी मॅक्कोनेन

matti makkolan  

‘मोबाईल नेटवर्क्स’द्वारे संदेश पाठविण्याची पद्धत विकसित करण्यास हातभार लावणारे मॅट्टी मॅक्कोनेन यांचे आजारामुळे निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. फिनलँडचे मॅटी मॅक्कोनेन यांनी जगाला १४० कॅरेक्टर्समध्ये संदेश पाठवण्याची सोय करून दिली होती.

एसएमएसचे जनक म्हणून जगभर ओळखले जात असूनही एसएमएस तंत्रज्ञान विकसित करण्याचे संपूर्ण श्रेय त्यांनी कधीही स्वत:कडे घेतले नाही. एसएमएस तंत्रज्ञान विकासाचा विषय निघताच हे तंत्रज्ञान आपण एकट्याने विकसित केले नसल्याचे ते त्वरित स्पष्ट करत. मोबाईल फोनद्वारे लिखित संदेश पाठविण्याची कल्पना त्यांनी सर्वप्रथम १९८४ मध्ये मांडली होती.