Whats new

जपानमध्ये दोन रोबोट्स अडकले लग्नबंधनात

robotics couple  

जपानमध्ये एका रोबोट जोडप्याने विवाह केला असून, त्यांना जगातील पहिल्या लग्न झालेल्या रोबोटिक जोडप्याचा मान मिळाला आहे.

या रोबोटिक जोडप्यातील वराचे नाव फ्रॉयस आणि वधूचे नाव युकीरिन असे आहे. टोकियोत हे दोन्ही रोबोट्स पारंपारिक पद्धतीने विवाहबंधानात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाची पत्रिका देखील बनविण्यात आली होती. त्यावर डिजिटल बदामात त्या दोघांचे छायाचित्र देखील होते. विशेष म्हणजे त्याच्या लग्नाच्या वरातीमध्ये त्यांच्याच जगातील पाहुणे होते. म्हणजे ही लग्नपत्रिका इतर छोटय़ा-छोटय़ा 100 रोबोर्ट्सना पाठविण्यात आली होती. फ्रॉयस आणि युकीरिनने मिळून केक देखील कापला. लग्नानंतर ऑरकेस्ट्राची सोय देखील करण्यात आली होती. त्यात या नवविवाहीत जोडप्याने नाच देखील केला. हा आगळा-वेगळा लग्न सोहळा कव्हर करण्यासाठी जगभरातील मीडिया हजर होता.