Whats new

अडीच हजारांत वर्षभर ‘टोल फ्री’ प्रवास : केंद्राचा नवा प्रस्ताव

Toll india  

टोलच्या त्रासापासून सर्वसामान्य आणि वाहन चालकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नव्याने हालचाली सुरू आहेत. वर्षांतून एकदाच अडीच हजार रूपये भरून वर्षभर देशात कुठेही ‘टोल फ्री’ प्रवास करा, असा प्रस्ताव सरकारने तयार केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. वर्षाला अडीच हजार रूपये भरून टोलचा वार्षिक पास काढण्याची ही योजना आहे. यामाध्यमातून वर्षभर देशाच्या कोणत्याही भागात राष्ट्रीय महामार्गावर ‘टोल फ्री’ प्रवासाची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर येणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास सर्वसमान्यांसह वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच टोल भरण्यासाठी टोल नाक्यावर रांगा लावण्याची व प्रत्येक वेळी टोल भरण्याची गरज भासणार नाही. वार्षिक पास काढणाऱ्या वाहनावर एक चीप बसविण्यात येणार आहे. त्यानंतर या वाहनाला वर्षभर मोफत प्रवासाची मुभा उपलब्ध होणार आहे.