Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

क्यूबा ठरला पहिला बाल एचआयव्हीमुक्त देश

Quba  

आईकडून बाळाला संक्रमित होणाऱ्या एचआयव्हीला संपवणारा क्यूबा हा जगातील पहिला देश ठरला आहे. डब्ल्यूएचओच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एचआयव्ही प्रसारविरोधी लढाईतील हा सर्वांत मोठा विजय आहे. एड्समुक्त पिढीचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेने पडलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. जागतिक स्तरावर आरोग्यासंबंधी जागृती, परीक्षण करण्याच्या सुविधेत सुधारणा आणि गर्भवती मातेची देखरेख यामध्ये वाढ केल्यामुळे हे यश मिळाल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 1 लाख जन्मलेल्या मुलांच्या तुलनेत 50 पेक्षाही कमी प्रकरणात आईकडून बाळाला एचआयव्हीचे संक्रमण झाले आहे. काही प्रकरणे यासाठी नमूद केली गेली आहेत, कारण आईकडून बाळाला संक्रमित होणाऱ्या एचआयव्हीला थांबविण्यासाठीचे एंटीरेट्रोवायरल उपचार 100 टक्के परिणामकारक नाहीत.