Whats new

सौदीचा प्रिन्स दान करणार 2 लाख कोटींची संपत्ती

Prince  

सौदी अरबमधील राजपूत्र आपली 2 लाख कोटी रूपयांची संपूर्ण संपत्ती दान करणार आहेत. महिलांसाठी आरोग्य सेवा आणि नैसर्गिक आपत्तीच्यावेळी मदत कार्यासाठी ही रक्कम खर्च करण्यात येणार असून, यासाठी लवकरच एक ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात येणार आहे.

अल वलीद बिन तलाल असे या दानशूर राजपुत्राचे नाव आहे. सौदी अरबचे ‘वॉरेन बफेट’ म्हणून त्यांची ओळख आहे. तलाल हे सौदी अरबचे संस्थापक इब्न सऊद यांचे नातू आहेत. 1960मध्ये सौदी अरबचे अर्थमंत्रीपद भूषविलेले तलाल जगातील गर्भश्रीमंतांपैकी एक आहेत. त्यांच्या नावावर 32 अरब डॉलर म्हणजेच जवळपास 2.04 लाख कोटी रूपयांची संपत्ती आहे. यामध्ये दोन सूपर यॉट, जगातील सर्वात मोठे खासगी जेट विमान आणि रॉल्स रॉयस, फेरारीसह लॅम्बोर्गिनीसारख्या 300 अलिशान मोटारींचा समावेश आहे.

आता ही सर्व संपत्ती दान करण्याचा निर्णय तलाल यांनी घेतला आहे. महिलांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासह नैसर्गिक आपत्तीच्यावेळी आर्थिक मदत करण्यासाठी ते एका ट्रस्टची स्थापना करणार आहेत. पैशांचा योग्य विनियोग व्हावा, असेच गरजुंनाच मदत मिळावी, यासाठी ते ट्रस्टच्या अध्यक्षपदी राहणार आहेत.