Whats new

सामाजिक, आर्थिक आणि जाती आधारित जनगणने 2011 अहवाल

Prince  

देशातील सामाजिक, आर्थिक आणि जातीनिहाय जनगणनेच्या डिजिटल सर्वेक्षणातून पुढे आलेले निष्कर्ष शुक्रवारी सादर करण्यात आले. विविध सरकारी योजना आणि कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात हे दस्तावेज उपयुक्त ठरणार आहेत. या आकडेवारीमुळे केंद्र आणि राज्य सरकारांना तसेच धोरणनिर्मात्यांना चांगल्याप्रकारे नियोजन करण्यात तसेच सरकारच्या धोरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या लोकांना सहाय्य करण्यात हातभार लागेल. राज्य, समुदाय, जाती आणि आर्थिक समुहांनिहाय तपशील असलेल्या या सर्वेक्षणात कौटुंबिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला आहे.

जनगणना अहवालातील ठळक मुद्दे :

- देशातील 24.39 कोटी जनतेपैकी 17.91 कोटी जनता खेड्यात राहते तर 10.69 कोटी जनता ही घरापासून वंचित आहे.

- 23.52 ग्रामीण भागातील कुटुंबात 25 वर्षांवरील साक्षर लोकांचे प्रमाण कमी आहे.

- ग्रामीण भागातील 4.6 टक्के कुटुंबे प्राप्तीकर भरतात.

- ग्रामीण भागातील 10 टक्के नोकरदार वर्ग प्राप्तीकर भरतात.

- अनुसूचित जातीमधील कुटुंबात प्राप्तीकर भरणाऱ्यांची टक्केवारी 3.49 टक्के आहे.

- अनुसूचित जमातीमधील कुटुंबाची प्राप्तीकर भरणाऱ्यांची टक्केवारी 3.34 आहे.

- देशात एकूण 17.91 कोटी कुटुंबे खेड्यात राहतात, त्यापैकी 2.37 कोटी कुटुंबे कच्च्या घरांमध्ये राहतात.

- देशात एकूण कुटुंबांपैकी 14 टक्के कुटुंबे सरकारी किंवा खासगी नोकरीच्या आधारे उदरनिर्वाह करताहेत.

- देशातील एक तृतीयांश जनता ही खेड्यात राहत असून त्यापैकी बहुतांश लोक मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात.

सार्वजनिक क्षेत्रात नोकरीतील कुटुंबे : १.११ टक्के

आयकरदाते ग्रामीण कुटुंबे : ४.६ टक्के

अनुसूचित जातींतील आयकरदाते कुटुंबे : ३.४९ टक्के

अनुसूचित जमातींतील आयकरदाते कुटुंबे : ३.३४ टक्के

रेफ्रिजरेटर असलेली कुटुंबे : ११ टक्के

स्वयंचलित वाहन असलेली कुटुंबे : २०.६९ टक्के

भूमीहीन : ५६ टक्के (त्यातील ७० टक्के अनुसूचित जाती, ५० टक्के अनुसूचित जमाती)

एका खोलीचे कच्चे घर असलेली कुटुंबे : २.३७ कोटी