Whats new

भारतीय अर्थव्यवस्था झाली सव्वा लाख अब्ज रुपयांची

Economic-Planning-in-India  

जागतिक स्तरावर आर्थिक महासत्ता बनण्यासाठी प्रयत्नशील असलेला भारत आता 2 ट्रिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे जवळजवळ 1,26,340 अब्ज रुपयांची अर्थव्यवस्था बनला आहे. या बाबतचा अहवाल ‘जागतिक बँके’ने प्रसिद्ध केला. या अहवालावरून भारतीय अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षात तेजीच्या लाटेवर स्वार झाल्याचे दिसून येत आहे.

जागतिक बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 2014 मध्ये भारताची जीडीपी (ग्रॉस डोमॅस्टिक प्रॉडक्ट) 1,26,340 अब्ज रुपयांवर पोहचली होती. यावेळी भारताची एकूण जीडीपी 2.067 ट्रिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे जवळजवळ 1,30,572.39 अब्ज रुपये आहे. मुख्य म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था प्रगतीच्या मार्गाने जात असली तरी चीनची अर्थव्यवस्था पाच पट आणि अमेरिकन अर्थव्यवस्था नऊ पटीने वृद्धी करीत असल्याचे स्पष्ट झाले.

केवळ 7 वर्षात जीडीपीमध्ये 63,170 अब्ज रुपये वृद्धी

प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, भारताने मागील 7 वर्षात केवळ आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे 63,170 अब्ज रुपये जोडले. यावर्षी भारत जगातील सर्वात तेजीने वृद्धी करणारी अर्थव्यवस्था असल्याचे जागतिक बॅंकेने म्हटले आहे. जरी भारताची अर्थव्यवस्था सव्वा लाख अब्ज रुपयांच्या पुढे गेली असली तरी देशात नागरिकांचे सरासरी वार्षिक उत्पन्न 1,01,430 रुपये असून हे मध्यमवर्गीय स्तरावरील आहेत.

अमेरिका-चीनपेक्षा भारत मागेच

जागतिक बँकेच्या अहवालानुसार, चीनची अर्थव्यवस्था 11.2 ट्रिलियन डॉलर म्हणजे 7,07,504 अब्ज रुपये आणि अमेरिका 18.1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर  एवढी असून जपान, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन हे देशसुद्धा भारताच्या पुढे गेले आहेत.