Whats new

कचरावेचकांना राष्ट्रीय पुरस्कार

KACHRA VECHAK  

देश स्वच्छ ठेवण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कचरा वेचकांसाठी राष्ट्रीय पुरस्कार सुरू करण्यात येणार आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली.

'देशात लक्षावधी कचरा वेचक आहेत. दीड लाख रुपयांचा हा राष्ट्रीय पुरस्कार असेल. देशातील तीन सर्वोत्तम कचरा वेचक आणि कचरा वेचण्याशी संबंधित नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या तीन संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे.