Whats new

भारतातील ही 15 शहरे आहेत सर्वाधिक प्रदूषित

Polluted city  

वाढत्या प्रदुषणामुळे पृथ्वीवरील सर्वच जीवांना धोका निर्माण होत आहे. लोकसंख्या वाढ हेच प्रदुषण वाढण्याचे मुख्य कारण असून, लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. वाढत्या लोकसंख्येचा देश असणाऱ्या भारतात आता खासगी वाहनांचे प्रमाण देखील वाढत असून, त्यातून निघणाऱ्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे.

देशाची राजधानी असणारे दिल्ली शहर हे भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक प्रदुषण असणाऱ्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकाही शहराचे नाव नाही.

सर्वाधिक प्रदूषित असणाऱ्या शहरांमध्ये दिल्लीनंतर या शहरांचा नंबर लागतो -

खन्ना (पंजाब)

अहमदाबाद (गुजरात)

जोधपुर (राजस्थान)

आग्रा (उत्तर प्रदेश)

अलाहाबाद (उत्तर प्रदेश)

लुधियाना (पंजाब)

अमृतसर (पंजाब)

कानपुर (उत्तर प्रदेश)

फिरोजाबाद (उत्तर प्रदेश)

लखनऊ (उत्तर प्रदेश)

रायपुर (छत्तीसगड)

ग्वालियर (मध्य प्रदेश)

पाटणा (बिहार)

देहरादून (उत्तराखंड)