Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या चिली प्रथमच विजेता - 2015

kopa american football  

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या 99 वर्षांच्या इतिहासात चिलीने प्रथमच बलाढ्य अर्जेंटिनाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-1 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.

सँतिएगोमधील स्टाडिओ नॅशनल मैदानावर  झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान चिलीला प्रथमच विजेतेपदावर आपले नाव कोरण्यात यश आले. चिलीच्या विजयामुळे अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीचे मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न अजूनही अधुरेच राहिले. अर्सेनल क्लबकडून खेळणारा चिलीचा खेळाडू ऍलेक्सिस सँचेझ याने पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतर विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयानंतर चिलीचा स्टार खेळाडू अरटुरो विडाल म्हणाला, की कोपा अमेरिका स्पर्धेत प्रथमच आम्ही अर्जेंटिनावर विजय मिळवू शकलो आहोत. त्यामुळे आमचे आतापर्यंतच स्वप्न पूर्ण झाले. आम्ही या सामन्यासाठी खूप मेहनत घेतली होता. त्याचे फळ आम्हाला विजेतेपदाच्या रुपाने मिळाले.