Whats new

नीती आयोग उपाध्यक्षांना केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा

Niti Aayog  

नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनागारिया यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पनागारिया यांच्या व्यतिरिक्त अन्य दोन सदस्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आले. पनागारिया यांना जेष्ठतेनुसार कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र त्यांचे वेतन आणि भत्ता कॅबिनेट सचिवाच्या वेतनाप्रमाणे देण्यात येत आहे.

अर्थशास्त्रज्ञ विवेक देबरॉय आणि शास्त्रज्ञ विजय कुमार सारस्वत यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. या दोघांनाही वेतन केंद सरकारच्या सचिवाप्रमाणे देण्यात येते. केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत उपस्थित राहण्यासाठी पनागारिया यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. त्यासाठी वेगळी नोटीस केंद्रामार्फत देण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. मोदी सरकारने नियोजन आयोग बरखास्त करून 1 जानेवारी रोजी नीती आयोगाची स्थापना केली होती.