Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

"यूजीसी'कडून देशभरातून 19 महाविद्यालयांची निवड वारसा दर्जा 2015"

UGC  

विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील एकोणीस महाविद्यालयांना वारसा दर्जा दिला आहे. त्याचा परिणाम म्हणून महाविद्यालयांना सुधारणांसाठी आता आर्थिक निधी दिला जाणार आहे. पुण्याचे फर्ग्युसन महाविद्यालय, मुंबईचे सेंट झेवियर्स महाविद्यालय, नागपूरचे हिस्लॉप महाविद्यालय यांचा समावेश आहे.

निवड समितीने १९ महाविद्यालयांची निवड केली असून आता त्यांना संवर्धनासाठी अनुदान दिले जाईल व विशेष वारसा संबंधित विशेष अभ्यासक्रम राबवता येतील, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हटले आहे.

कॉटन महाविद्यालयाला ४.३५ कोटींचे अनुदान मिळणार आहे. लंगट सिंग महाविद्यालय येथे महात्मा गांधी चंपारण सत्याग्रहावेळी राहिले होते व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद तिथे राहिले होते. या संस्थेला १५ लाखांचे अनुदान दिले जाईल. मीरत महाविद्यालयाला १.३४ कोटी मिळणार असून मुरलीमनोहर जोशी, चौधरी चरण सिंह हे त्यांचे माजी विद्यार्थी आहेत.

वारसा दर्जा मिळालेली महाविद्यालये

सीएमएस महाविद्यालय - कोट्टायम, सेंट जोसेफ महाविद्यालय - त्रिची, खालसा महाविद्यालय - अमृतसर, सेंट बेडेज महाविद्यालय - सिमला, ख्राइस्ट चर्च महाविद्यालय - कानपूर, ओल्ड आग्रा महाविद्यालय - आग्रा, मीरत महाविद्यालय - मीरत, लंगट मानसिंग महाविद्यालय - मुझफ्फरपूर, गव्हर्नमेंट ब्रेनन महाविद्यालय - केरळ, युनिव्हर्सिटी महाविद्यालय - मंगळुरू, कॉटन महाविद्यालय - गुवाहाटी, मिदनापूर महाविद्यालय - पश्चिम बंगाल, गव्हर्नमेंट मेडिकल सायन्स महाविद्यालय - जबलपूर, गव्हर्नमेंट गांधी मेमोरियल सायन्स महाविद्यालय - जम्मू, कन्या महाविद्यालय - जालंधर, सेंट झेवियर महाविद्यालय - कोलकाता.