Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

फिफा महिला विश्वचषक 2015 स्पर्धेत अमेरिका अजिंक्य

american football  

कार्ली लॉईडने एखाद्या विश्वचषकातील फायनलमध्ये हॅट्ट्रिक नोंदवण्याचा दुर्मीळ पराक्रम साकारल्यानंतर अमेरिकेने फिफा महिला विश्वचषक स्पर्धेचे अजिंक्यपद संपादन केले. त्यांनी अंतिम फेरीत विद्यमान जेत्या जपानचा 5-2 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. अमेरिका आता या स्पर्धेचे जेतेपद तीनवेळा संपादन करणारा पहिलाच देशही ठरला आहे. अमेरिकेने यापूर्वी 1991 व 1999 मध्येही जेतेपद संपादन केले होते. या विजयासह त्यांनी जपानविरुद्ध 2011 मध्ये अंतिम फेरीत स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाचाही वचपा काढला.

लॉईडला गोल्डन बॉल पुरस्कार

एखाद्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत उभय संघांची ही एकूण तिसरी महत्त्वाची लढत ठरली. अमेरिकेने यापूर्वी 2012 मध्ये जपानविरुद्ध 2-1 अशा विजयासह ऑलिम्पिक सुवर्ण जिंकले, त्यावेळी देखील लॉईडनेच दोन्ही गोल नोंदवले होते. 2011 फायनलमध्ये पेनल्टी चुकवलेल्या कर्णधार लॉईडने यावेळी आपला खेळ उंचावण्यात कोणतीच कसर सोडली नाही. तिला या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला दिल्या जाणाऱ्या गोल्डन बॉल पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. या अंतिम लढतीत 53341 चाहत्यांनी अमेरिकेला उत्तम पाठबळ दर्शवले. अमेरिकेचीच गोलरक्षक होप सोलो हिला गोल्डन ग्लोव्ह्जचा बहुमान मिळाला तर कॅनडाच्या कादीशा बुकाननला स्पर्धेतील सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार मिळाला.