Whats new

रोजगारात महाराष्ट्र देशात अव्वल

emploment  

आर्थिक गणना : 1977,1980,1990,1998,2005,2011

महाराष्ट्र उद्योगात देशात पुढे आहे की नाही, हा अलीकडील काळातील वादाचा मुद्दा ठरला असला तरी तो रोजगारात मात्र देशात सगळ्यात पुढे असल्याची माहिती सहाव्या आर्थिक गणनेतून पुढे आली आहे. या गणनेचे अस्थायी निष्कर्ष राज्याचे अप्पर गणना आयुक्त ए. डी. देव यांनी जाहीर केले आहेत. त्यानुसार राज्यात आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींची संख्या १४३.८ लाख (देशाच्या तुलनेत ११.३ टक्के) आहे. आस्थापनांच्या संख्येत मात्र कोल्हापूरने सगळ्यांना मागे टाकले असून या जिल्ह्यात ५ लाख ७० हजार आस्थापना असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक साधनांच्या आधारे २०११ मध्ये केलेल्या सामाजिक, आर्थिक व जातीय जनगणनेचे निष्कर्ष ३ जुलैला जाहीर केले.

या गणनेचे निष्कर्ष असे : १) पाचव्या आर्थिक गणनेच्या (२००५) तुलनेत राज्यातील एकूण रोजगारात ३६.५ टक्के वाढ झाली असून ती देशपातळीवर ३४.४ टक्के इतकी आहे. २) राज्यातील आस्थापनांची एकूण संख्या ६१.३ लाख (देशाचा विचार करता १०.५ टक्के) राज्याचा उत्तर प्रदेश (११.४८) नंतर दुसरा क्रमांक लागतो. ३) पाचव्या आर्थिक गणनेच्या तुलनेत (२००५) राज्यात आस्थापनांच्या संख्येत ४७.५ टक्के वाढ. देशपातळीवर ही ४१.७ टक्के वाढ. ४) राज्यात ५७.३ टक्के आस्थापना ग्रामीण भागात. देशपातळीवर हे प्रमाण ५९.९ टक्के. ५) महाराष्ट्रात २.१ टक्के आस्थापना हातमाग व हस्तव्यवसायांशी संबंधित. देशपातळीवर हेच प्रमाण ३.८ टक्के. ६) राज्यातील ४६ टक्के रोजगार ग्रामीण भागात असून देशपातळीवर हे प्रमाण ५१.९ टक्के आहे. ७) राज्यात ४९.८ वेतनी कामगार असून देशात हे प्रमाण ४५.७ टक्के आहे. ८) राज्यात २२.९ टक्के महिला कामगार असून देशपातळीवर हे प्रमाण २५.६ टक्के.

---------------