Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

न्यायमूर्ती मदनलाल लक्ष्मणदास टहलियानी राज्याचे नवे लोकायुक्त

tahaliyani lokayukta  

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला फासावर चढवण्याचा निकाल देणारे मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती मदनलाल लक्ष्मणदास टहलियानी यांचे नाव राज्याच्या लोकायुक्तपदी निश्चित करण्यात आले आहे. लोकायुक्तांकडील ४ हजार प्रकरणे सुनावणीच्या प्रतीक्षेत आहेत. टहलियानी हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील असून, तेथे सरकारी वकील म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीला प्रारंभ केला. १९८७ मध्ये त्यांची मुंबईत महानगर दंडाधिकारी पदावर नियुक्ती झाली. गुलशनकुमार खून खटला, दत्ता सामंत खून खटला अशा गाजलेल्या खटल्यांचे कामकाज त्यांनी केले. मार्च २०११ पासून टहलियानी हे मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कामकाज करीत असून, त्यांची त्या पदावरील मुदत २३ डिसेंबर २०१५ रोजी संपत आहे.