Whats new

महिला हॉकी संघाचे रिओ ऑलिम्पिकच्या आशा कायम

hockey  

जवळपास ३५ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये खेळण्याच्या स्वप्नाच्या दिशेने कूच करणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचे दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत करण्यात आले. भारतीय महिला संघाने बेल्जियममध्ये झालेल्या जागतिक हॉकी लीग स्पर्धेत अव्वल पाचमध्ये स्थान पटकावून रिओ ऑलिम्पिकच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

रिओ ऑलिम्पिकच्या शर्यतीत राहण्यासाठी अव्वल पाचमध्ये राहणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया संघाचे प्रशिक्षक सी. आर. कुमार यांनी दिली. १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने प्रथम आणि अखेरचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्याला सातत्याने अपयश आले. मात्र, यंदा त्यांनी पाचवे स्थान पटकावून ऑलिम्पिकच्या आशा कायम राखल्या आहेत.