Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

‘अशोक लेलॅण्ड’चा ‘बस ऍवॉडर्स 2015’ मध्ये गौरव

Bas Award  

‘बस अलायन्स इंडिया प्रा. लि.’ आणि भारतातील झपाट्याने वाढते ऑनलाइन बस तिकीट बुकिंग पोर्टल ‘अभिबस.कॉम’ यांनी इंडिया बस ऍवॉर्डस् 2015 मध्ये बस क्षेत्राला सन्मानित केले. हा कार्यक्रम मुंबईमध्ये आयटीसी मराठा येथे आयोजित केला होता.

या पुरस्कार समारंभासाठी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित होते. देशातील अशा प्रकारच्या पहिल्या वहिल्या पुरस्काराने बस क्षेत्राच्या कामगिरीचा गौरव केला गेलाच. शिवाय देशातील परिवहन जाळ्यावर लक्षणीय परिणाम केलेल्या सर्वोत्तम ऑपरेटरलाही गौरवले. हे पुरस्कार खासगी व सरकारी परिवहन कंपन्यांतील फ्लीट ऑपरेटरना देण्यात आले.