Whats new

भारतीय बँकाची स्थिती चिंताजनकच

Indian Bank  

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये चांगली वसुली झाल्यानंतरही सरकारी क्षेत्रातील बँकांची स्थिती चिंताजनक असल्याचे मत रेटिंग एजन्सी ‘फिच’ ने म्हटले आहे. फिचच्या ‘इंडियन बँक्स’ अहवालात आर्थिक वर्ष 2014-15 नुसार, भारतातील सरकारी क्षेत्रातील बँकांचे प्रदर्शन मार्च 2015 रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात आव्हनात्मक बनले आहे.

या अहवालानुसार, बँकांची आर्थिक वर्ष 2018-19 पर्यंत प्रत्येक वर्षी रोख वाढण्याची शक्यता आहे. कमी कालावधीत बँकांच्या उत्पन्नातही काही प्रमाणात सुधारणा होईल. मात्र बँकांवर कर्जाचे ओझे कायमच राहिल. मुख्य म्हणजे आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये भारतीय बँकांसाठी एक मोठे लक्ष्य होते. या दरम्यान अर्थव्यवस्थेत चांगली वसुली होऊनही कर्जाची मागणी कमकुवत राहिली. प्रामुख्याने सरकारी बँकांच्या एसेट क्वालिटीवर दबाव आहे.

फिचच्या अहवालानुसार, कर्ज वृद्धी मागील दशकातील सर्वात कमी म्हणजे 9.7 टक्के राहिली. बँकांचे प्रामुख्याने गृह आणि कृषी कर्जावर प्रामुख्याने लक्ष आहे. 2014 च्या आर्थिक वर्षात ‘एनपीएल’ प्रमाण एकूण एसेट वाढून 4.6 टक्के झाला. जो 4.1 टक्के होता. तसेच आर्थिक वर्ष 2015-16 साठी भारतीय बँकांचा कर्ज परतावा अधिक असण्याची शक्यता अधिक आहे. अर्थव्यवस्था सुधारत चालल्याने बँकांच्या अडकलेल्या कर्जाची फेड होईल.