Whats new

'अंबुजा'च्या महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील सिमेंट प्रकल्पात मॅगी या नूडल्सची पाकिटे नष्ट करण्याचा निर्णय

magee  

अन्न व औषध प्रशासनाने मॅगी नूडल्सवर बंदी आणल्यानंतर 'नेस्ले इंडिया'ने मॅगी नूडल्सची पाकिटे नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. 'मॅगी'ची पाकिटे नष्ट करण्यासाठी 'अंबुजा सिमेंट'ची मदत घेण्यात येणार असून, त्यासाठी त्यांना २० कोटी रुपये देण्यात आले आहेत.' मॅगीमध्ये चवीसाठी मोनोसोडियम ग्लुटामेटचा मर्यादबाहेर समावेश केल्याने केंद्रीय अन्न व सुरक्षा नियामक मंडळाने (एफएसएसएआय) मॅगीवर बंदी आणली होती. त्यामुळे 'नेस्ले इंडिया'च्या नऊ प्रकारच्या नूडल्सवर बंदी घालण्यात आली होती; तसेच बाजारातील नूडल्स परत मागविण्यात आल्या होत्या. 'नेस्ले इंडिया'ने या नूडल्स नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजारातील तब्बल ३२० कोटी रुपयांच्या नूडल्स परत मागविण्यात आल्या आहेत. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावरील नूडल्स नष्ट करण्यासाठी 'अंबुजा सिमेंट' कंपनीची मदत घेण्यात येणार आहे.