Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

मेवेदरकडून 'फाइट ऑफ द सेन्चुरी' किताब परत घेतला

Mevedar  

वर्ल्ड बॉक्सिंग ऑर्गनायझेशनने नियम तोडल्या प्रकरणी फ्लॉयड मेवेदरचा 'फाइट ऑफ द सेन्चुरी' हा किताब परत घेतला आहे. वेल्टरवेट गटात त्याला वर्ल्ड चॅम्पियन घोषित करण्यात आले होते. त्यासोबत त्याला २०० मिलियन डॉलरचे (जवळपास १२६० कोटी रुपये) बक्षिस मिळाले होते, ते त्याने अद्याप परत केलेले नाही. उत्पन्नाच्या बाबतीत जगातील अव्वल अँथलिट असलेल्या मेवेदरने २ मे रोजी फिलिपिन्सचा बॉक्सर मॅनी पकयाऊला १२ व्या राऊंडपर्यंत चाललेल्या जोरदार लढतीत पराभूत करत करकिर्दीतील ४८ वा विजय साजरा केला होता. लास वेगास येथे झालेल्या या लढतीला फाइट ऑफ द सेन्चुरी म्हटले गेले होते.

वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार्‍या बॉक्सरला एकाच वजनी गटात सहभागी होता येते, मात्र मेवेदरने वेल्टवेटसह आणखी दोन वजनी गटात सहभाग नोंदवला होता आणि त्यात विजय देखील मिळविला होता. त्यामुळे त्याला किताब देता येणार नसल्याचे डब्लूओबी ने म्हटले आहे