Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

सार्वजनिक शौचालये उभारण्यात दिल्ली सर्वांत पुढे

Sarvaganik Swachta  

सार्वजनिक शौचालयांची उभारणी या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग असलेल्या उपक्रमात राजधानी दिल्ली सर्वांत पुढे असल्याची माहिती समोर आली आहे. सार्वजनिक शौचालयांची उभारणी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग आहे.

घरोघरी शौचालये उभारणीमध्ये गुजरात सर्वांत पुढे आहे. दरम्यान अलिकडे राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत राजधानी दिल्ली पुढे गेली आहे. दिल्लीमध्ये आतापर्यंत 5776 सार्वजनिक शौचालये उभारण्यात आली आहे. त्याखालोखाल छत्तीसगढमध्ये 3,570 तर महाराष्ट्रामध्ये 2,520 शौचालये उभारण्यात आली आहेत. महाराष्ट्रानंतर कर्नाटकाचा क्रमांक लागतो. कर्नाटकमध्ये 1680 शौचालये उभारली आहेत.