Whats new

मध्यप्रदेशातील व्यापमं घोटाळ्या

Vyapam Scam  

मध्य प्रदेशात व्यावसायिक परीक्षा मंडळाने (व्यापमं) नोकरभरती केली होती. त्यावेळी सरकारकडून पैसे देऊन नोकर्‍या वाटल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचेही नाव आहे. व्यापमं घोटाळा हा मध्यप्रदेशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे सांगण्यात येते. यात सरकारी नोकरीत १००० जणांची तर, मेडिकल कॉलेजमध्ये ५१४ जणांची बोगस भरती केल्याचा आरोप आहे. भरतीप्रकरणात माजी मंत्र्यासह शेकडो जणांना अटक झाली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या प्रकरणाशी संबंधितांचे मृत्यूचक्र सुरू झालेय. त्यामुळे या प्रकरणाचे पडसाद आता देशभर उमटत असून, संशयाचे जाळेही वाढत आहे. दोन अधिष्ठाते, एक पत्रकार, दोन पोलिसांसह जवळपास ४५ हून जास्त जणांचा या प्रकरणाच्या अनुषंगानेच बळी गेल्याचे बोलले जात आहे. अद्याप पूर्ण सत्य समोर न आल्याने सीबीआय चौकशीची मागणी केली जात होती. आता मुख्यमंत्र्यांनी शिफारस केल्याने चौकशीतून काय निष्पन्न होईल, हे लवकरच समजणार आहे.