Whats new

नरसिंग, योगेश्वर जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी पात्र

Yogeswar dutt  

लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक जिंकणारा योगेश्वर दत्त आणि नरसिंग यादव यांची जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या निवड चाचणीनंतर विविध गटातील खेळाडू निश्चित झाले. लास व्हेगास येथे सप्टेंबर महिन्यात (७ ते १२) ही जागतिक स्पर्धा होणार आहे. आता जागतिक स्पर्धेतून पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना पात्र होण्याची संधी असेल.

जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेले मल्ल : फ्रीस्टाइल : ५७ किलो : अमित कुमार, ६१ किलो : सोनू, ६५ किलो : योगेश्वर दत्त, ७० किलो : अरुणला पुढची चाल. ७४ किलो : नरसिंग यादव, ८६ किलो : नरेश कुमार, ९७ किलो : मौसम खत्री, १२५ किलो : सुमित. ग्रीको रोमन : ५९ किलो : रवींदर सिंग, ६६ किलो : दीपक, ७१ किलो : एम. रफिक, ७५ किलो : गुरप्रीत स‌िंग, ८० किलो : हरप्रीत सिंग. ८५ किलो : मनोजकुमार, ९८ किलो : हरदीप, १३० किलो : नवीन.

विनिश, गीता विश्व कुस्ती स्पर्धेसाठी पात्र :

7 ते 12 सप्टेंबर दरम्यान लास व्हेगास येथे महिलांची विश्व कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे. ग्लॅस्गो राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी विनिशने 48 किलो वजन गटात रिटू फोगेटला पराभूत करून विश्व कुस्ती स्पर्धेसाठी आपले तिकिट निश्चित केले. गीता फोगेटने 58 किलो वजन गटात साक्षी मलिकचा पराभव करत आपली पात्रता सिध्द केली आहे.