Whats new

योगेश्वर दत्त विश्व कुस्ती स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व करणार

yogeswar dutta  

लंडन आलिम्पिकचा कांस्य विजेता मल्ल योगेश्वर दत्त हा अमेरिकेतील लास वेगास येथे ७ ते १४ सप्टेंबर या कालावधीत आयोजित होणाऱ्या विश्व कुस्ती स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व करणार आहे.

२०१६ च्या रियो आलिम्पिकचे तिकीट पक्के करण्यासाठी भारतीय मल्लांना विश्व स्पर्धेत चमकदार कामगिरी करावी लागेल. या स्पर्धेसाठी खाशाबा जाधव कुस्ती स्टेडियममध्ये भारतीय संघाची निवड चाचणी घेण्यात आली. ही चाचणी एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेला साजेशी अशीच होती.